top of page

समृद्ध कोकण संघटनेच्या स्थापनेमागील भूमिका 

आम्ही कोण आहोत ?

देशाला स्वातंत्र्य मिळाले व कोकणाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले का ? आत्मपरीक्षणाची आवश्यकता ..

शिक्षक ,तलाठी, ग्रामसेवक कृषी सेवक , लॅब टेक्निशियन सर्व सरकारी अधिकारी 95 टक्के कोकणाबाहेरील

मासे पकडणारे मच्छिमार कोकणात पण

मासे विकणारे, प्रक्रिया करणारे सगळे व्यापारी कोकणा बाहेरील

काजू पिकतो कोकणात पण काजूवर प्रक्रिया करणारे कारखाने कोकणा बाहेर

हापुस आंबा पिकतो कोकणात पण आंबा विकणाऱ् व्यापारी सगळे कोकणा बाहेरील 

 

कोकणातल्या जमिनी सोन्याच्या खाणी

पर्यटन माशांची शेती प्रक्रिया बागायती अमाप संधी पण जमिनी विकत घेणारे

कोकणा बाहेरिल

खाड्या नद्या प्रदूषित करणारे मच्छीमाराना उध्वस्त करणारे एमआयडीसी मधील कारखाने कोकणात पण कारखान्यांचे मालक आणि त्यांच्याकडचे कामगार कोकणाबाहेरील.

कोकणातील तरुण घाटकोपर भांडुप कळवा दिवा डोंगरावर झोपडपट्टीत बांधकाम साहित्य हार्डवेअर बेकरी स्वीट मार्ट सर्व व्यवसाय करणारे गुजराती मारवाडी केरळी उत्तर भारतीय कोकणात निसर्ग समृद्ध गावागावात उद्योग करतात.

वायनरी उद्योग, समुद्रकिनारी पर्यटन, वॉटर स्पोर्ट्स, राफ्टिंग, साहसी पर्यटन

वाळू काढणे, जांभा दगडखाण .....स्थानिक संसाधनांचे उपयोग करून उद्योग करायचे तर परवानगी नाही, सरकारी नोटीस आणि जाच. आणि हा जाच करणारे कोकणाबाहेरील अधिकारी

काजू बी, सुपारी, भात कोकणातल्या पिकांना हमीभाव नाही, महाराष्ट्रात सर्वत्र शेतकऱ्यांना मदत आहे पण कोकणातल्या आंबा बागायतदारांना मच्छीमारांना कर्जमाफी एकदाही नाही

गेली पंचवीस वर्षे श्री संजय यादवराव हे विषय सातत्याने मांडत आले आहेत परंतु यावर काही कायम स्वरूपी उत्तर मिळाले नाही आणि म्हणूनच श्री शिवराज्याभिषेकाच्या दिवशी रायगडावरील श्री जगदीश्वराच्या मंदिरात श्री संजय यादवराव आणि त्यांच्या निवडक शिलेदारांनी शपथ घेतली कोकणच्या शाश्वत विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची आणि त्यातूनच उदयास आली समृद्ध कोकण संघटना 

new Logo Swarajyabhumi Andholan_edited.p

कार्यालयाचा पत्ता :

ऑफिस नंबर : सी  ४ १ ५ ,

पहिला मजला, रणजित स्टुडिओ कंपाउंड, दादासाहेब फाळके मार्ग,

दादर (पूर्व )  मुंबई  ४ ० ० १ ४  

दूरध्वनी क्रमांक 

८ ७ ७ ९ ८  ४ २ ० ० ९ 

९ ० ८ २ ५  ५ ० ७ ७ ४ 

bottom of page